ऑर्डर
0

LOADING IMAGES

नारळ
coconut


510     850   40% Off
1 Pcs

नारळ अत्यत बहूपयोगी असे फळझाड आहे. शेतकरी बांधवाना नारळाचे उत्पादन वाढविणे आज गरजेचे झाले आहे आहे कारण भारता मध्ये व भारताच्या बाहेर नारळाला खूप मागणी आहे मात्र हवा तसा उत्पन्न पुरवठा होत नसल्यामुळे ना...

आपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः
*Expected Delivery in 4-10 Days

नारळ अत्यत बहूपयोगी असे फळझाड आहे. शेतकरी बांधवाना नारळाचे उत्पादन वाढविणे आज गरजेचे झाले आहे आहे कारण भारता मध्ये व भारताच्या बाहेर नारळाला खूप मागणी आहे मात्र हवा तसा उत्पन्न पुरवठा होत नसल्यामुळे नारळाचे भाव खूप मोठया प्रमाणात वाडलेले आपणास जाणवत असेल

महाराष्टातील शेतकर्याच्या परीस्तीतीचा परिपूर्ण अभ्यास करून चारुता अग्रो च्या कृषी शास्त्रज्ञांनी शेतकरी बांधवांच्या स्थाई उत्पन्न मिळणे करिता नारळामध्ये बुटकी व उंच अशी नाविन्यपूर्ण , फळे आकाराने मोठी , बाजारात चांगला भाव मिळणारी  व तिसर्याच वर्षात उत्पन्न देणारी व्हेरायटी प्रदर्शित केली आहे.   
 

भारतामध्ये नारळाची लागवड अनेक शतकांपासून केली जाते. त्यामध्ये केरळ, तामिळनाडू,कर्नाटक, आणि आंध्रप्रदेश हे राज्य नारळ लागवडी करिता जगातील सर्व प्रथम राज्य मानले जाते. मात्र महाराष्ट्रातील शेतकरी नारळ लागवडी कडे वळले नाही त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे झाडाची उंची व लागवडीचा अनुभव आहे.

महाराष्ट्रातील नारळ लागवडीसाठी प्रामुख्याने कोकण विभागापुरतेच मर्यादित आहे. नारळाच्या झाडाचा कुठलाही भाग वाया जात नाही. नारळाच्या फळांपासून तेल व खोबरे मिळते, तसेच झाडाच्या पानांपासून झाडू, खराटे तर काथ्यापासून दोर, चटई, गाद्या, हस्तकला वस्तू इत्यादी विविध वस्तू बनवतात. नारळाच्या अपक्क फळांना (शहाळ्यांना) शहरी विभागात खूपच मागणी आहे. वर्षभर उत्पादन देणार्‍या या झाडाला त्याच्या विविध उपयुक्ततेमुळे 'कल्पवृक्ष' असे म्हणतात. जमीन आणि हवामानाचा विचार करता नारळाच्या लागवडीस महराष्ट्रात बराच वाव आहे. 
 

नारळाची लागवड उष्ण कटिबंधातील भागात चांगल्या प्रकारे होते नारळाच्या झाडाची वाढ ३५ ते ४५ डी. सेल्सिअस तापमानात चांगली होते. १० डी. सेल्सिअसपेक्षा कमी तापमान नारळाच्या झाडाच्या वाढीला हानीकारक असते आपल्या कंपनी दिल्या जाणारे नारळाचे रोपे विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील हवामानात खूप चागल्या पद्धतीने येते. आपली कंपनी द्वारा दिल्या जाणार्या रोपांची योग्य काळजी घेतल्यास सुद्धा विदर्भात खूप चांगल्या पद्धतीने नारळाचे उत्पन्न आपण घेऊ शकतो

नारळ हे बागायती फळझाड असून पाण्याची सोय असल्यास विविध प्रकारच्या पण उत्तम निचरा होणार्‍या जमिनीमध्ये नारळाची लागवड करता येते.अतिभारी, चिकण व पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसलेल्या जमिनीवर नारळाची लागवड करू नये. पाण्याच्या निचर्‍याची योग्य व्यवस्था करून (मोठे दर खोदून) नारळ लागवड करणे शक्य आहे. सुधारलेल्या खार जमिनीतही नारळाची लागवड करू नये. खाचराच्या रुंद बांधावर तसेच ज्या जमिनीमध्ये पाण्याची पातळी खूप वर आहे अशा ठिकाणी जमिनीच्या तालीवर नारळाची लागवड करावी. 
 

नारळाच्या झाडाच्या उंचीवरून नारळाच्या जातींची विभागणी उंच वाढणार्‍या जाती आणि बुटक्या जाती अशी केली जाते. मालेटीयन ही उंच वाढणारी जात आहे तर हायब्रीट ही बुटकी जात आहे. 

नारळाच्या लागवडीसाठी निवडलेली जमिन उन्हाळ्यापूर्वी तयार करावी. जमीन तयार केल्यानंतर उन्हाळ्यात ८ x ८ मीटर अंतरावर १ x x १ मीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. एका हेक्टरमध्ये नारळाची १५० ते १५६ झाडे लावावीत. खड्डे भरताना खड्ड्याच्या तळाला पालापाचोळा घालून त्यावर शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि पोयट्याची माती यांचे मिश्रण टाकून साधारणपाने अर्धा खड्डा भरावा. नारळाची रोपे खड्ड्यात लावताना प्रत्येक खड्ड्यात १ किलो कल्पतरू सेंद्रिय खत आणि सिंगल सुपर फॉस्फेट मातीने चांगले मिसळावे, अशा खतमिश्रित मातीने खड्ड्याचा उरलेला भाग भरावा.नारळाचे रोपे लावताना त्याचा कोंब मातीत गाडला जाणार नाही याची काळजी घ्यावी. रोपे जसे वाढत जाईल तसे खड्डा मातीने भरून घ्यावा. नारळाच्या रोपांची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला करावी किवा पाण्याची व्यवस्था असेल तर आपण नारळाची लागवड कधीही करू शकतो . परंतु लागवडीच्या जागी पाणी साचण्याची शक्यता असेल तर अशा भागात रोपांची लागवड ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात म्हणजे जोराचा पाऊस संपल्यावर करावी. नारळाच्या रोपाभोवती पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

 

नारळाच्या झाडांना चांगल्या वाढीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची गरज असते. खते आणि पाणी नियमित दिले तर नारळाची वाढ होऊन झाड ५ ते ६ वर्षांतच फुलोर्‍यावर येते. पहिल्यावर्षी शेणखत १० किलो, नत्र २०० ग्रॅम , स्फुरद १०० ग्रॅम, पालाश २०० ग्रॅम आणि कल्पतरू सेंद्रिय खत ५०० ग्रॅम या प्रमाणात द्यावे. नंतर पुढे तेवढेच प्रमाण वाढवून दरवर्षी खते द्यावीत.
नत्र व पालाश ह्या खतांच्या मात्रा जून, सप्टेंबर आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये तीन वेळा विभागून द्याव्यात. तर शेणखत, कल्पतरू सेंद्रिय खत आणि स्फुरद संपूर्ण मात्रा जूनमध्ये द्यावी.
झाडाच्या बुंध्यापासून एक मीटर अंतरावर ३० सेंमी रुंदीचा व १५ सेंमी खोलीचा चर काढून त्यात खते द्यावीत आणि चर पुन्हा बुजवावा. जसजसे रोप मोठे होईल तसतसा चर बुंध्यापासून दूर काढावा.
 

नारळाच्या झाडांना नियमितपणे पाणी दिले तर त्यांचे उत्पादन बर्‍याच प्रमाणात वाढते. नारळाच्या झाडांना मुख्यत्वेकरून उन्हाळ्यात पाणी देण्याची जास्त आवश्यकताही असते. काही ठिकाणी पावसाळ्यानंतर नारळाच्या झाडांना पाणी दिले जात नाही. परिणामी झाडांची योग्य वाढ होत नाही आणि उत्पादन कमी मिळते.नारळाची नवीन लागवड केल्यानंतर पहिली १ ते २ वर्षे झाडांना हिवाळ्यात व उन्हाळ्यात आठवड्यातून दोन वेळा पाणी द्यावे. पूर्ण वाढलेल्या नारळाच्या झाडांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५ ते १० दिवसांतून वेळा पाणी द्यावे. नारळाच्या झाडाच्या बुंध्याभोवती झाडाच्या आकारानुसार १ ते २ मीटर व्यासाचे गोल किंवा चौकोनी आले करून पाणी द्यावे. पाणी झाडाच्या खोडाजवळ फार काळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. नारळाच्या झाडाच्या जोमदार वाढीसाठी बाग स्वच्छ ठेवणे आवश्यक असते. सुरुवातीच्या काळात भाजीपाल्यासारखी आंतरपिके घेतल्यास बागेमध्ये तणांचे प्रमाण कमी होते. बागेत वाढलेली तणे पाणी आणि अन्नासाठी मुख्य पिकाशी स्पर्धा करतात. म्हणून नियमित आंतरशागत करून बाग स्वच्छ ठेवावी. तणनाशकांचा आणि आच्छादनांचा वापर करूनही तणांचा बंदोबस्त करता येतो.

नारळाच्या झाडावर किडींची जे नोंद करण्यात आली आहे. ती पुढील प्रकारे आहे गेंड्या भुंगा, सोंड्या भुंगा आणि काळ्या डोक्याची अळी या किडी काही प्रमाणावर दिसून येतात.  वरील  कीटकांचे उपद्रव टाळण्यासाठी नारळाच्या प्रत्येक झाडावर बेचक्यात २५० ग्रॅम लिंडेन भुकटी टाकावी.
प्रत्येक झाडावर भुंग्यामुळे पडलेल्या सर्वांत वरच्या भोकात २० ग्रॅम ५०% कार्बारिल टाकावे. कीडनाशक औषधे टाकण्यापूर्वी खालची सर्व भोके मातीने बंद करावीत. अथवा भोके वाळू आणि १० % लिंडेन १:१ प्रमाणात मिसळून भरवीत. सोंड्या भुंगा खालच्या भागावर वेष्टन तयार करून पानांतील हरितद्रव्ये खातो. त्यामुळे पाने करपल्यासारखी दिसतात. ह्या किडीची पादुर्भाव नारळाच्या सर्व पानांवर झाल्यास झाड वाळल्यासारखे दिसते आणि झाडाची उत्पादनक्षमता कमी होते.
किडीचा बंदोबस्त करण्यासाठी ४० ग्रॅम ५०% कार्बारिल भुकटी (पाण्यात मिसळणारी) १० लिटर पाण्यात मिसळून नारळाच्या झाडांवर फवारावी.
 

नारळाच्या झाडाला फुलोरा आल्यापासून १२ महिन्यांनी त्याची फळे पक्क होतात. या वेळी फळाचा हिरवा रंग जाऊन पिवळसर तपकिरी रंग येतो. नारळाच्या तयार फळावर टिचकी मारल्यास खणखणीत आवाज येतो. घडातील सर्व फळे जवळजवळ एका वेळी तयार होतात. पाडेली झाडावर चढून कोयत्याने नारळाचा घोस कापून काढतो. शहाळ्यासाठी नारळाची पहले ६ ते महिन्यांची असताना अथवा आवश्कतेनुसार काढतात. त्यावेळी फळात पाणी भरलेले असते.
नियमितपणे भरपूर फळे देणार्‍या नारळाच्या झाडाला साधारणपणे दर महिन्याला एक पुष्पगुच्छ म्हणजेच एक घड येतो. त्यानुसार दर महिन्याला साधारणपणे एक घड काढणीस येणे गृहीत असले तरी साधारणपणे वर्षाला नारळाच्या एका झाडाला कमीत कमी ५ ते ६ पुष्पगुच्छ येतात.
ठेंगण्या जातींना तिसऱ्या वर्षी आणि उंच जातींना ४ थ्या वर्षी फळे येण्यास सुरुवात होते. नारळाचे उत्पादनक्षम आयुष्य ठेंगण्या जातीत ४० ते ५० आणि उंच जातीत ७० ते ८० वर्षे असते.
महाराष्ट्रात नारळाचे सरासरी उत्पादन प्रत्येक झाडापासून वर्षाला ३० ते ४० नारळ फळे इतके मिळते. परंतु बागेची योग्य काळजी घेतल्यास, खत आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास आणि कीड व रोगांपासून संरक्षण केल्यास एका झाडापासून १०० ते १२५ किंवा त्याहूनही जास्त फळे मिळू शकतात.

 

Coconut: - Coconut is a very fruitful fruit tree. Growth of the production of coconut is very important as the farmers have started to grow, because the coconut is very demanding in India and outside India, but if you do not get the required fuel supply then you feel that the prices of coconut are very high.


Through a thorough study of farmers' decisions in the field of agriculture, Charuka Agro's agricultural scientists have been able to provide sustainable income for the farming brothers, in the coconut, innovative, fruitful, fruitful, and a good price in the market, and in the third year the variety of products has been displayed.


Coconut is cultivated in India for many centuries. In these states, Kerala, Tamil Nadu, Karnataka and Andhra Pradesh are considered to be the first state in the world to cultivate coconut. But the farmers of Maharashtra did not turn to coconut cultivation, the most important reason is the plant height and cultivation experience.


Coconut cultivation was good in the tropical areas of coconut growth from 35 to 45 Degree. Celsius was good at temperature. 10d. Lesser temperature than Celsius is harmful to the growth of coconut tree. Coconut seedlings provided by your company come in a very good way in the weather conditions of Vidarbha, Marathwada and Khandesh. If you do not take proper care of the plants given by your company, you can also get good yield of coconut in Vidarbha


Coconut is a horticultural fruit tree and can be cultivated in different types of well-drained land if the water is available. Coconut cultivation should not be cultivated on land which is not suitable for ground water, ground water and ground water. It is possible to cultivate coconut by arranging proper water drilling (by large rate digging). Coconut planting should not be done in improved saline soil. The coconut plant should be planted on the stretch of the clay as well as in the land where the water level is very high.


From the height of coconut tree, coconut varieties are classified as high growth varieties and goats. The Maltese is growing high and the hybrid is going down.

Prepare the land selected for coconut cultivation before summer. After making the land, take pots of 1x1x1 meter in the distance of 8 x 8 m in summer. In one hectare, 150 to 156 coconut trees should be planted. Fill the pits at the bottom of the puddle and fill half a patch with a mixture of compost and homogeneous soil. In pits of coconut seed, each kilogram must be well mixed with 1 kg Kalpataru organic fertilizer and single super phosphate soil, 

Fill the remaining part of the pits with such perishable soil. Care should be taken to keep the pods in the soil as it is not possible to keep its pods in the soil. As the seedlings grow, the pit should be filled with soil. If coconut seedlings are planted in the beginning of monsoon or there is a water supply, then you can never plant coconut. But if there is a possibility of water accumulation in the place of cultivation, then the seedlings in such areas Planting should be done in the month of August - September, ie, when the rainfall is over. Take care that the coconut plant does not have enough water.

Coconut trees need nutrients, phosphorus and potash for good growth. If the fertilizers and water are given regularly, the coconut tree comes in the flowering area within 5 to 6 years. In the first year, fertilizers should be given to 10 kg of fertilizers, 200 grams of nitrogen, 100 grams of phosphorus, 200 grams of potash and 500 gm of Kalpataru organic fertilizer. After that, fertilizers should be given every year to increase the quantity. The quantity of fertilizers should be divided three times in the month of June, September and February. If the fertilizer, artificial organic fertilizer and phosphorus should be given in full in June. At a distance of one meter from the plant's tree, remove the 30 cm width and 15 cm depth of the chamber and give it fertilizer and the grapes should be resurrected again. As the plants grow larger, the variables should be removed from the bloom

 
If the coconut plants are given water regularly, their production increases significantly. Coconut trees are also more important to give water in the summer. In some places, coconut trees are not given water after rainy season. The resultant trees do not grow properly and the yield is low. After first new plantation of coconut, after the first plantation of 1 year to 2 years, water should be given twice in the winter and summer during the week. 5 to 10 full-grown coconut trees like the ground Watering time from day to day. Around the pillar of coconut tree, give water by making rounds of 1 to 2 meters in diameter, or round the square according to the size of the tree. Take care that the water does not remain intact for long. It is necessary to keep the garden clean for the vigorous growth of the coconut tree. In the beginning, weeding of vegetables like vegetables will reduce the weeds in the garden. Increased weeds in the garden compete with the main crop for water and food. Therefore, regular interdependence Keep the garden clean. Weed management can be done even after using weed and weeds.

 

The pest of the coconut has been recorded. It is in the following way: The pistil weevil, the weed weevil and the black-headed larvae appear in some form. To avoid the disorder of the above pests, take 250 grams of linden powder in each and every tree of coconut. And 20 grams of 50 grams of Carbill should be kept in the top hole in the gutter on each tree. Before leaving pesticides, remove all the holes below. Or hollow sand and 10% linden 1: 1 Mix well. The sandy weevil creates an overlay on the lower part and drinks green leaves in the leaves. So the leaves look like a grapple. If the pest of the insect occurs on all the pages of coconut, the tree looks like wax and the plant's productivity decreases. To control the pest, add 40 grams of 50
                
              

Subscribe For Newsletter

We send you latest news couple a month ( No Spam).