ऑर्डर
0

LOADING IMAGES

सि-गोल्डन -सिताफळ (शरीफा)
C- Goldan-Custard Apple (Sharifa)


145    

सि-गोल्डन-सिताफळ

सि-गोल्डन सिताफळ ही चारुता अग्रो द्वारा शेतकरी बांधवानकरिता प्रदर्शित केलेली अत्यंत महत्वाची प्रजाती आहे. महाराष्ट्रमध्ये सि-गोल्डन-सीताफळाची लागवड जळगाव, बीड, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात खूप मोठया प्रमाणात झाल...

आपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः
*Expected Delivery in 4-10 Days

सि-गोल्डन-सिताफळ

सि-गोल्डन सिताफळ ही चारुता अग्रो द्वारा शेतकरी बांधवानकरिता प्रदर्शित केलेली अत्यंत महत्वाची प्रजाती आहे. महाराष्ट्रमध्ये सि-गोल्डन-सीताफळाची लागवड जळगाव, बीड, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात खूप मोठया प्रमाणात झाली असून थाई-सिताफळ  हे आकाराने मोठे असतात सि-गोल्डन-सिताफळाचे वजन ७५० ते १००० ग्रॅम पर्यंत होत असून बियांचे प्रमाण खूपच कमी राहते सि-गोल्डन सीताफळामध्ये साखरेचे प्रमाण 20% ते  २३% राहते व गराचे प्रमाण ७० ते ७५% राहते थाई-सीताफळाचे झाड ४ ते ६ मीटर उंचीपर्यंत वाढणारे असून सि-गोल्डन-सिताफळाचे फळे काढणी करिता आल्यावर चौदा ते सोळा दिवस झाडावर टिकून राहू राहतात व  काढणी नंतर दहा ते बारा दिवस टणक राहतात आणी अजिबात तडकत नाही. थाई-सिताफळ हे चवीला गोड असल्याने या फळांना ग्रामीण शहरी भागांमध्ये खुप मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

सि-गोल्डन सीताफळाचा गर मऊ, दुधाळ, रसाळ व मधूर आहे.

सि-गोल्डन-सिताफळ हे गाळाच्या जमिनीत, पाण्याचा निचरा होणार्‍या जमिनीत किंवा लाल मुरमाड, हलक्या, खडकाळ, डोंगरकाठच्या जमिनीत व  दगड गोटे असलेल्या जमिनीत चांगल्या प्रकारे येते. भारीकाळी व पाण्याचा निचरा न होणार्या जमीनीत सिताफळाची लागवड करू नये. कोरडे व उष्ण हवामान सि-गोल्डन सिताफळाच्या झाडांच्या व फळांच्या वाढीसाठी पोषक असून महाराष्टातील प्रत्येक भागांमध्ये सि-गोल्डन सिताफळाची उत्कृष्ट प्रकारे लागवड करता येते प्रक्रिया उद्योगामध्ये सि-गोल्डन-सीताफळाला मोठया प्रमाणात मागणी आहे. सि-गोल्डन सिताफळ हे High Density Plant असल्यामुळे ८ बाय १४ अंतरावर लागवड करता येते एकरी ३९० रोपे लागतात.  इतर सर्व सिताफळ प्रजातीची फळ धारणा ही सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये होते मात्र सि-गोल्डन-सीताफळाची फळ धारणा नोव्हेबर ते डिसेम्बर  या महिन्यात होत असल्यामुळे शेतकर्यांना चांगल्या प्रकारे लाभ होतो. सि-गोल्डन सीताफळाच्या लागवडीसाठी जमिन पूर्व-पश्चिम निवडावी. १ x १ x १ फुट आकाराचे खड्डे घ्यावेत.  व ८ x १४ अंतरावर लागवड करावी खड्डा भरताना ३ ते ४ किलो शेणखत आणि ५०० ग्रॅम बायो-एफ सेंद्रिय खत व १० मिली रुटेक यांचे मिश्रण करून मातीसह खड्डा भरावा. शक्यतो नैसर्गिक खतेच द्यावीत. खतांची जास्त मात्रा सिताफळाच्या झाडास लागत नसून झाडांच्या वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी ३ ते ४ घमेली शेणखत किंवा कंपोस्ट खत सिताफळाच्या प्रत्येक झाडास द्यावे. झाडाचे वय जस जसे वाढेल तसतसे खताचे प्रमाण वाढवावे. बायो-एफ सेंद्रिय खत २५० ग्रॅम प्रत्येक झाडास वापरणे उत्तम राहील. सि-गोल्डन सिताफळाच्या झाडांस जास्त पाण्याची आवश्यकता नसते. परंतु सुरवातीला ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोन वर्ष पाणी द्यावे व नंतर नोव्हेबर ते डिसेंबर फळे पक्क होण्याच्या सुमारास एक दोन वेळेस पाणी द्यावे म्हणजे फळाचा आकार व दर्जा वाढेल. सि-गोल्डन -सिताफळाची छाटणी ही जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात करावी. छाटणी करताना सुकलेल्या, फांद्या डोळ्याच्या वर छाटाव्यात, कारन झाडांस मार्च एप्रिलमध्ये फुलकळी लागते. फुलकळी ही चवीला गोड असल्याने तिला कीड लागण्याची शक्यता असते. तसेच उन्हाळ्यातील उष्णतेमुळे कळीचा देठ सुकतो आणि दक्षिणेकडील वाऱ्याने तो गळून पडतो. परिणामी माल कमी लागून उत्पादनात घट येते. त्या साठी स्प्रिरीट ची फवारणी वेळा पत्रकाप्रमाणे घेतल्याने कळी गळ होत नाही. तसेच फळे काळी पडण्यापासून संरक्षण होते. शिवाय फळे भरपूर लागून, फळे मोठी, एकसारखी येऊन गरामध्ये गोडी वाढते. डोळ्यांचा आकार वाढून, डोळे ठळक, उठावदार दिसतात. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात. थाई-सिताफळांस ग्रामीण व शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असून दूरच्या बाजारपेठेत पाठविताना मार्केटचा व्यवस्थित अंदाज घेऊन मगच झाडावरून फळे पक्क होण्याच्या थोडे अगोदर काढणी करून बाजारपेठेत ताबडतोब पाठवावी.मुंबई मार्केटमध्ये मोठ्या सिताफळास ७० ते १०० रू. किलो असा भाव मिळतो. सि-गोल्डन सिताफळाच्या निर्यातीस मध्य पूर्व युरोपीय देशांमध्ये, आखाती देशांत चांगले मार्केट असून जर्मनी, इंग्लंड देशामध्ये सिताफळ निर्यात होते.
टीप :- (१) बाजारामध्ये खूप कमी सि-गोल्डन- सीताफळाचे कलमी रोपे विक्रेते आहेत. सावध गिरीने व्यवहार करावा (२) लागवडी पासून २ वर्ष नेहमीत पाणी द्यावे ड्रीप व्यवस्था सर्वोत्तम (३) दोन वर्षा नंतर फेब्रुवारी ते जुन पाणी देऊ नये. नोव्हेबर ते डिसेंबर  पाणी द्यावे.(४) पाण्याची व्यवस्था असल्यास लागवड केव्हाही करता येते.

 

 

C-Golden custrd Apple

C-Golden Sitafal is a very important species that is displayed to farmers by Charuta Agro. C-Golden-Sitafal is cultivated in Maharashtra in Jalgaon, Beed, Aurangabad, Ahmednagar, Nashik, Solapur district, and Thai-Sitaphal are large in size; C-Golden-Sitafal Weigting 750 to 1000 g The seed ratio is much lower; the sugar content is 20% to 23% in the C-Golden

Subscribe For Newsletter

We send you latest news couple a month ( No Spam).