ऑर्डर
0

about us

Farmer's service for the productivity of farmers

आत्मियतेच्या भावनेने आपणास परिपूर्ण सेवा देण्याच्या दृष्टीने आम्ही आपल्या सेवेत आपल्या हक्काची कंपनी स्थापन केली आहे. कंपनी स्थापने अगोदर आम्ही आपणास सेवा देण्याचे शासकीय निमशासकीय मार्गाचा परिपूर्ण उपयोग करून सुध्दा आपल्याला सेवा देण्याचे आमचे उद्देश पूर्ण  झाले नाही.शेवटी आम्ही तळागाळात जाऊन सर्व समस्यांचा खगोल अभ्यास करून आपल्या सेवेत चारुता अग्रो सर्विस प्रा.लि.नावाने आपल्या हक्काची कंपनी स्थापन केली आहे. आणि कंपनी स्थापन करणारे आम्ही दुसरे कोणी नसून शेतकऱ्यांचीच मुले आहोत कारण शेतकऱ्यांच्या भावना हे कोणी व्यावसायिक समजू शकत नाही. शेतकऱ्यांच्या भावना समजायला स्वत: शेतकरी होणे गरजेचे असते. गेल्या चार ते पाच वर्षापासून आपल्यावर येणाऱ्या असंख्य समस्येचा आम्ही विचार करून आम्ही आमच्या उद्देशाची स्थापना केली आहे. आम्ही असे असंख्य शेतकरी पहले जे अडाणी असतांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खूप चांगल्या पद्धतीने व कमी पाण्यात व कमी लागत खर्चात खूप चांगल्या पद्धतीने शेती करतात याचे मुख्य कारण म्हणजे ते शासनाच्या कुठल्याही सेवेचा किंवा कार्मच्यांऱ्यांची मदत घेत  नाही. त्या सर्व समृद्ध शेतकऱ्यान कडे त्यांचे स्वतः वैयक्तिक कृषी तज्ञ आहेत आणि ते त्यांना वार्षिक फी देतात आपल्या विदर्भात असे नाही. आपण शेजाऱ्यांच्या किंवा दुकानदाराच्या सांगण्यावरून शेती करतो.शेत मालाची मागील कधी आहे व किती आहे. ह्याचा आपण कधी अभ्यास करत नाही. आपण आपल्या परिवाराला घेऊन दिवस रात्र कबाडकष्ठ करतो. कारण आपल्या मुख्य व्यवसाय शेती आहे.जर आपला मुख्य व्यवसाय शेती आहे. तर खरोखर आपण मार्केट मध्ये व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याप्रमाणे शेती करतो का? नाही करत ना स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर सुद्धा आपण कर्जबाजारी आहो. कारण आपणास आतापर्यंत अस कोणीही मार्गदर्शक नाही सापडले जे आपणास आपल्या पायावर उभे करून आपणास स्वावलंबी करेल. आपल्या शेती व्यवसायाला सतत २० वर्षापासून मिळत असलेल्या नैराश्यतेमुळे आपला शेतकरी बांधव खुप जास्त प्रमाणात आत्महत्येकडे वळला आहे. सतत शेतकरी बांधवांना हात पसरावा लागत आहे. शासनाने जी मदत केली त्यातून आपण आपला उदरनिर्वाह करत आहे व आपल्या धरती माते कडे दुर्लक्ष करत चाललो आहे. आपल्या वैयक्तिक जीवनाप्रमाणे शेती सुद्धा आपण शार्ट-कट पद्धतीने करायला लागलो आहे. पारंपारिक पिके सोडून आपण विदेशी पिकांना व विदेशी वस्तूंचा वापर करून आपल्या भूमीचा नाश करण्याकडे वळलो आहे. ८ ते १० टक्के शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करून स्वावलंबी झाले आहेत आपण कसे होऊ शकतो ह्याच्याकडे लक्ष देणे आज काळाची गरज झाली आहे. आणि आम्ही सुद्धा हेच प्रयत्न करीत आहोत. अपेक्षा आहे तर आपल्या सहकार्याची कारण आम्ही कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या सहकार्या शिवाय शक्य होणार नाही.

                                                                                                                                                                                                        आपला विश्वासू

सुरेश रा.ठेंगरी                                                                                                 

चेयरमेन चारुता अग्रो सर्विस प्रा.लि.नेर.   

                                                                                                                                                              

745+
Own Farm Houses
2480+
Pastoral Farmers

Subscribe For Newsletter

We send you latest news couple a month ( No Spam).